S M L

देहूरोडजवळ लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू, दोघं जखमी

Samruddha Bhambure | Updated On: Dec 1, 2015 06:58 PM IST

देहूरोडजवळ लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू, दोघं जखमी

01 डिसेंबर : लोणावळ्याच्या दिशेने निघालेल्या लोकलमधून पडून आज (मंगळवारी) एका तरुणीचा मृत्यू झाला. या अपघातात अन्य दोघंजण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एक तरूण आणि तरुणीचा समावेश असून, त्यांना देहूरोडमधल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

पिंपरीमधून दुपारी 3च्या सुमारास निघालेल्या लोकलमध्ये दोन तरुणी चढल्या. लोकलमध्ये गर्दी असल्यामुळे या दोघी मैत्रिणी दरवाजामध्ये पाय खाली सोडून बसल्या होत्या. लोहमार्गावरील बापदेवनगर इथे दुरुस्तीच्या कामामुळे लोखंडी सळ्या ठेवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पाय अडकून निकिता अगरवाल ही तरुणी खाली पडू लागली. त्यावेळी तिच्या मैत्रिणीने (हर्षदा तलारी) तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. दोघीही खाली पडणार हे लक्षात आल्यावर तिथेच उभे असलेल्या धर्मराज तोडकर या तरूण प्रवासीने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. यामध्ये हे तिघेही धावत्या लोकलमधून खाली पडले. लोहमार्गानजीक राहणार्‍या काही लोकांनी या तिघांना रुग्णालयात नेले. तिथे निकिताला मृत घोषित करण्यात आलं. तर हर्षदा तलारी आणि धर्मराज तोडकर या दोघांवर उपचार सुरू आहेत. देहूरोड लोहमार्ग पोलीस ठाण्याचे अधिकारी पुढील तपास करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 1, 2015 06:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close