S M L

पुण्यात स्मार्ट सिटीला वाढता विरोध, भाजपची मात्र महाआरती

Sachin Salve | Updated On: Dec 14, 2015 02:13 PM IST

पुण्यात स्मार्ट सिटीला वाढता विरोध, भाजपची मात्र महाआरती

14 डिसेंबर : स्मार्ट सिटीला मनसे आणि शिवसेनेनं विरोध दर्शवल्यानंतर आता पुण्यातही स्मार्टसिटीला जोरदार विरोध होताना दिसतोय. महापालिकेसमोर  संघटनेनी स्मार्टसिटीला विरोध करण्यासाठी निदर्शनं केली. तर दुसरीकडे भाजपने प्रस्ताव मंजूर व्हावा यासाठी महाआरती केलीये.

सरकारने स्मार्टसिटीचा प्रस्ताव 15 डिसेंबर पूर्वी मंजूर करावा यासाठी दिलेल्या आदेशानुसार पुण्यात आज विशेष सभेच आयोजन करण्यात आलंय. पुण्याचे आयुक्त प्रस्तावाच सादरीकरण करणार आहेत. मनसे आणि काँग्रेसने स्पेशल पर्पज व्हेहिकल स्थापन करण्याला विरोध केलाय.

उपसुचनांसह प्रस्ताव मंजूर केला तरच पाठिंबा देणार असल्याची भूमिका राष्ट्रवादीने घेतलीय. तर दुसरीकडे हा प्रस्ताव मंजूर व्हावा यासाठी भाजपने महाआरती केली. तर वेगवेगळ्या संघटनांनी महापालिकेच्या गेटवर निदर्शनं केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 14, 2015 02:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close