S M L

कोथरुडमध्ये सिलेंडर स्फोटामुळे आग, 5 जणांचा मृत्यू

Sachin Salve | Updated On: Dec 16, 2015 09:24 PM IST

कोथरुडमध्ये सिलेंडर स्फोटामुळे आग, 5 जणांचा मृत्यू

16 डिसेंबर : पुण्यातील कोथरुड परिसरात भीषण अग्नितांडव घडलंय. कोथरुडमधील डाव्या भुसारी कॉलनीत शेडला लागलेल्या भीषण आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या आगीत एक जण गंभीर जखमी झाला आहे. आगीनंतर 3 सिलेंडरचा स्फोट झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, संध्याकाळी सहाच्या सुमारास डाव्या भुसारी कॉलनीत मयुरेश डायनिंग हॉलशेजारच्या शेडमध्ये ही आग लागली होती. या शेडचं बांधकाम सुरू असतांना वेल्डिंगचं काम सुरू होतं त्यावेळी आगेचा भडका उडाला. शेडला आग लागल्यानंतर स्थानिकांनी तातडीने धाव घेत 3 ते 4 जणांचा जीव वाचवला. पण, सिलेंडर स्फोटामुळे 5 जणांचा मृत्यू झालाय. हा स्फोट इतक भयानक होता की, तिघांचा जळून कोळसा झालाय. ज्या ठिकाणी ही घटना घडली ती जागा अनधिकृत असल्याची माहिती मिळतेय. या शेडमध्ये एक गादीचा कारखाना सुरू होता. त्यामुळे आग भडकली. हा कारखानाही अनधिकृत असल्याचा दावा स्थानिकांनी केलाय. सध्या आग आटोक्यात आलीये. 10 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 16, 2015 07:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close