S M L

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सोनिया गांधींवर आरोप अयोग्य, पवारांकडून पाठराखण

Sachin Salve | Updated On: Dec 21, 2015 11:45 AM IST

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सोनिया गांधींवर आरोप अयोग्य, पवारांकडून पाठराखण

21 डिसेंबर : आमच्या काळात सुडाचं राजकारण नव्हतं. विरोधकांशीही जिव्हाळ्याचे संबंध असायचे पण आज उलटं चित्र पाहण्यास मिळत आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी गांधी परिवारावर होणारे आरोप, हे योग्य नाही असं परखड मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त करत सोनिया गांधी आणि राहुल गांधींची पाठराखण केली.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा रविवारी अमृतमहोत्सव पुण्यात रेसकोर्सवर साजरा करण्यात आला. यावेळी शरद पवार यांचा भव्य सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, अजित पवार आणि इतर सर्व बडे नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी पवारांनी नॅशनल हेरॉल्ड प्रकरणावरुन सुरू असलेल्या राजकारणावर भाष्य केलं. आताचं राजकारण आणि पूर्वीच्या राजकारणात फरक दिसतोय. पूर्वी मतभेद असायचे पण प्रेमाचे संबंध असायचे आणि एकत्र राहायचे. कित्येक व्यक्तींसोबत मी राजकीय संघर्ष केला. पण व्यक्तीगत जिवनात ओलावा कधी कमी झाला नाही. आज त्या ओलाव्याची कमी पाहण्यास मिळत आहे. माझं नव्यापिढीला आवाहन आहे. राजकारणात राहा, धोरण आखा, कार्यक्रम राबवण्यासाठी कष्ट करा. आपल्या विचारधारेला विरोध करणार्‍यांना विरोध करा, पण हे करत असतांना वैयक्तिक संघर्ष होता कामा नये हे सामाजिक जिवनात लक्षात घेतले पाहिजे. सूडाचे राजकारण कधी केले नाही पाहिजे असं आवाहन पवारांनी तरुणांना केलं.

तसंच नॅशनल हेरॉल्ड पेपर हा जवाहरलाल नेहरू यांनी काढला होता. त्यात गुंतवणुकीही गांधी घराण्याने केली. आणि आज त्यांच्यावर कोर्टाची पायरी चढण्याची वेळ आलीये. हे योग्य नाहीये. जेणे हे विश्व उभं केलं असलं तरी त्याला उद्‌ध्वस्त करण्यास फारसं काही लागत नाही. पण हे सर्व उभं करण्यासाठी आपली शक्ती वापरायची असते. हे उभं करण्यासाठी दोन्ही हातं आणि माणसं वापरायची असता आज त्याची खर्‍या अर्थाने गरज आहे असंही शरद पवार म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 21, 2015 11:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close