S M L

पैशांची ‘धोधो’ उधळपट्टी ; जावईबापूंना ऑडी, फॉर्च्युनर आणि बुलेट भेट !

Sachin Salve | Updated On: Dec 22, 2015 12:09 PM IST

पैशांची ‘धोधो’ उधळपट्टी ; जावईबापूंना ऑडी, फॉर्च्युनर आणि बुलेट भेट !

pimpri mar22 डिसेंबर : लग्नसोहळा म्हटलं तर दोन जीवांचा मिलन...पण आता या सोहळ्यात पैशांची उधळपट्टी मोठ्याप्रमाणावर केली जाते. पिंपरी-चिंचवडमध्ये तर उधळपट्टीची सिमाच ओलंडण्यात आली. होणार्‍या जावाईबापूंसाठी चक्क ऑडी, फॉर्च्युनर आणि 12 बुलेट्सचा नजराणा दिलाय. इतकंच नाही तर ओवाळणी करणार्‍या आत्यासाठी ऍक्टिव्हा आणि लग्नाला पाहुण्यांसाठी सोन्याच्या अंगठ्या देण्यात आल्या.

चिंचवड आणि मावळमधल्या दोन बड्या घराण्यांमध्ये शाही विवाह पार पडला. यात जावयांचा अनोखा मानसन्मान करण्यात आला. नव्या जावयाला ऑडी देण्यात आली. तर दुसर्‍या जावयाला फॉर्च्युनर देण्यात आली. भावकीतल्या इतर जावयांसाठी 12 बुलेट देण्यात आल्या. या नव्या कोर्‍या गाड्या लग्नमंडपात लावण्यात आल्या होत्या. लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांचाही तोलामोलात मानसन्मान करून त्यांना खूश करण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 22, 2015 12:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close