S M L

इसिसच्या संपर्कात असलेल्या 3 तरुणांपैकी एकाला पुणे एटीएसने घेतलं ताब्यात

Samruddha Bhambure | Updated On: Dec 23, 2015 09:30 AM IST

इसिसच्या संपर्कात असलेल्या 3 तरुणांपैकी एकाला पुणे एटीएसने घेतलं ताब्यात

22 डिसेंबर : मालवणीतून गायब झालेल्या तीन तरुणांपैकी एका तरुणाला दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) त्याला पुण्यातून ताब्यात घेतलं. वाजिद शेख असं ताब्यात घेतलेल्या तरूणाचं नावं आहे. हे तिघेही तरुण इसिसच्या वाटेवर गेल्याचा दाट संशय निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर तरुणाकडे कसून चौकशी करण्यात येत असून बेपत्ता असलेल्या बाकी दोघांचा शोध सुरू आहे.

मालाडच्या मालवणी परिसरात राहणारे मोहसिन शेख, अयान सुलतान आणि वाजिद शेख हे तिघे तरुण गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या पालकांनी मालाड पोलिसांना दिली होती. त्यानंतर मालाड पोलिस, 'एटीएस' या तरुणांचा शोध घ्यायला सुरुवात केली होती.

दरम्यान, रात्री उशिरा वाजिद शेखला पुणे एटीएसने मालवणी पोलिसांच्या ताब्यात दिलं. तसंच, वाजिद शेखला ताब्यात घेतल्यानंतर महत्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 23, 2015 09:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close