S M L

...तर मोदी एका दिवसात संपला असता, सबनीसांचा तोल ढळला

Sachin Salve | Updated On: Jan 1, 2016 08:39 PM IST

...तर मोदी एका दिवसात संपला असता, सबनीसांचा तोल ढळला

01 जानेवारी : मोदी पाकिस्तानात गेले. पाकिस्तानात जाणं म्हणजे मरायची लक्षण... हातात शिर घेऊन गेल्यासारखं आहे. तिथे हाफीज सईद आहे. दाऊद आहे. दहशतवादाचे अड्डे तिथे आहे. कुणाची गोळी, कुणाचा बॉम्ब तिथे पडला असता तर मोदी एका दिवसात संपला असता आणि मंगेश पाडगावकर यांना श्रद्धांजली वाहण्याआधी मोदींची शोकसभा घ्यावी लागली असती अशी मुक्ताफळं उधळलीये साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी.

साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्रीपाल सबनीस तिखट भाषेसाठी ओळखले जातात. पिंपरी चिंचवडमध्ये रामकृष्ण मोरे महाविद्यालयाच्या विद्यार्थी संमेलनात बोलत असतांना सबनीसांनी भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकाच वेळी स्तुती केली आणि टीकाही केली. एवढंच नाहीतर मोदीचा एकेरी उल्लेख केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या.

तुमच्या संघाचा पंतप्रधान मोदी थेट पाकिस्तानला जातो. खूप पुळका होता का ?, नव्हता...मुळात पाक राष्ट्राबद्दल त्यांना पुळका होता. गोंध्रा हत्याकांडातला मोदी हा कलंकीत मोदी आहे. आजचा पंतप्रधान मोदी गांधींचं नाव घेतो. काँग्रेसला गांधी वंदनीय आहे. बुद्धांचंही नाव घेतो. आयसिससह संबंध दहशतवादी संघटनेचा दहशतवाद संपवण्यासाठी संपूर्ण 34 राष्ट्रांना एकत्र यावं यासाठी मोदी आघाडी घेतोय. एवढंच काय तर चीन, अमेरिकेशी मैत्री करतो.सगळीकडे बोंबलत फिरतो. पण, गांधी आणि बुद्धाचं नाव घेतो असा पंतप्रधान राष्ट्रवादी आहे की नाही ? पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे हे राष्ट्रवादाचे लक्षण आहे का ? असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.

हाफीज सईद पाकिस्तानात आहे, दाऊद आहे. तिथे जागोजागी दहशतवाद्यांचे अड्डे आहेत. साधी गोळी लागली असती किंवा बॉम्ब पडला असता तर मंगेश पाडगावकरांना श्रद्धांजली अर्पण करण्यापूर्वी मोदींची शोकसभा घ्यावी लागली असती असं वादग्रस्त विधानही त्यांनी केलं. एकंदरीतच सबनीसांनी संमेलनाच्या आधीच वादग्रस्त वक्तव्य करत संमेलनध्यक्षीय भाषणा आधीच हे भाषण चर्चेचा विषय ठरलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 1, 2016 05:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close