S M L

नक्षलवाद्यांनी अपहरण केलेल्या पुण्यातील 3 विद्यार्थ्यांची सुटका

Samruddha Bhambure | Updated On: Jan 3, 2016 02:38 PM IST

नक्षलवाद्यांनी अपहरण केलेल्या पुण्यातील 3 विद्यार्थ्यांची सुटका

03 जानेवारी : नक्षलवाद्यांनी अपहरण केलेल्या पुण्यातील तिन्ही विद्यार्थ्यांची नक्षलवाद्यांकडून सुखरुप सुटका केली आहे. तिघेही सध्या चिंतलनार पोलीस ठाण्यात असल्याचीही माहिती बस्तर पोलिसांनी दिली आहे.

भारत जोडो अभियानातील सायकल रॅलीत सहभागी होण्यासाठी गेलेल्या पुण्यातील तीन तरुणांचं नक्षलवाद्यांनी अपहरण केलं होतं. हे विद्यार्थी पुणे ते ओडिशा व्हाया छत्तीसगड दरम्यानच्या सायकल रॅलीत सहभागी झाले होते. विकास वाळके, आदर्श पाटील आणि श्रीकृष्णा शेवाळे अशी या विद्यार्थ्यांची नावं आहेत.

हे विद्यार्थी 22 डिसेंबरला पुण्यातून सायकल चालवत छत्तीसगडमार्गे ओडिशात जाणार होते. मात्र 29 डिसेंबरला सुकमा जिल्ह्यातून जगरगुंडा भागात अपहरण करण्यात आलं होतं.

अपहरणाच्या पार्श्वभूमीवर बस्तर पोलिसांनी नक्षलवादविरोधी अभियान थांबविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नक्षलवाद्यांनी या तीनही मुलांची सुटका केली. सध्या हे तिघेजण छत्तीसगडच्या सीआरपीएफच्या कॅम्पवर दाखल झाले आहेत. गडचिरोली पोलिसांना तरूणांच्या सुटकेची माहिती देण्यात आली असून, या तिघांना लवकरच पुण्यात पाठवण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 3, 2016 02:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close