S M L

मोबाईलवर गाणी ऐकू दिली नाही म्हणून मुलीची आत्महत्या

Sachin Salve | Updated On: Jan 10, 2016 09:29 PM IST

मोबाईलवर गाणी ऐकू दिली नाही म्हणून मुलीची आत्महत्या

10 जानेवारी : मोबाईलवर गाणी ऐकण्यास आईने मनाई केल्याने रागाच्या भरात मुलीने नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड़ परिसरात घड़लीये. मृगनयनी पाचपिंडे असं आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.

मृगनयनी शनिवारी सकाळी घरात मोबाईलवर गाणी लावून ऐकत बसली होती. तिच्या आईने तिच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला आणि तिला गाणे ऐकण्यास मनाई करत घराकामात थोडा हातभार लावण्यास सांगितलं. याचा मृगनयनीला खूप राग आला. तीने थेट कालेवाडी परिसरातून वाहणारर्‍या पवना नदीत उड़ी मारून आत्महत्या केली. नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच वाकड पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने तिचा मृतदेह बाहेर काढला असून शवविच्छेदनासाठी तिचा मृतदेह वायसीएम हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 10, 2016 07:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close