S M L

गाडीची बॅटरी चोरल्याच्या संशयावरुन मुलाला जिंवत जाळलं

Sachin Salve | Updated On: Jan 14, 2016 12:51 PM IST

CrimeScene2पुणे 14 जानेवारी : पुण्यामध्ये असवंदेनशीलता आणि अमानुषतेचा कळस म्हणावा अशी घटना घडलीये. गाड्या चोरण्याच्या संशय आला म्हणून एका 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलाला जिवंत जाळण्यात आलंय.  कसबा पेठेत हा धक्कादायक प्रकार घडलाय. संजय राठोड असं या दुदैर्वी मुलाचं नाव आहे. तो 60 टक्के जळालाय. त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

संजय राठोड बुधवारी दुपारी 3 च्या सुमारास कसबा पेठेत एका गाडीजवळ खटपट करत असताना काही तरुणांनी त्याला पाहिलं. त्यांना चोरीचा संशय आला आणि त्यांनी त्याला मारहाण केली आणि त्याला पेटवून दिलं. यात तो 60 टक्के जळालाय. गाड्यांची बॅटरी चोरल्याच्या संशयावरुन तीन जणांनी या संजय राठोडला पेटवून दिलं. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आलीये. दोघांचा पोलीस शोध घेत आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 14, 2016 12:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close