S M L

साहित्यिकांनी साहित्यावर वाद घालावेत, इतर वादात पडू नये -मुख्यमंत्री

Sachin Salve | Updated On: Jan 16, 2016 04:51 PM IST

साहित्यिकांनी साहित्यावर वाद घालावेत, इतर वादात पडू नये -मुख्यमंत्री

पिंपरी चिंचवड - 16 जानेवारी : साहित्य संमेलन हे एक पावित्र्य आहे. समाजाला दिशा देणारं हे व्यासपीठ आहे. त्यामुळे साहित्यिकांनी साहित्यावर वाद घालावेत, इतर वादांपासून दूर राहावं, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शरद पवार यांच्या सुरात सूर मिसळत साहित्यिकांना फटकारलं. तसंच विचारांना कुणीचं संपवू शकत नाही. हा देश सहिष्णु आहे आणि सहिष्णुच राहिलं असंही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.

संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांची पंतप्रधान मोदींवर एकेरी भाषेत टीकेमुळे भाजपचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहित्य संमेलनाला हजर राहता की नाही

या चर्चेला उधाण आलं होतं. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साहित्य संमेलनाला हजेरी लावली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी साहित्यिकांनी राजकारणात पडू नये असा सल्ला देत आमचा कित्ता गिरवू नका असा सल्ला दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शरद पवारांच्या भाषणाचा दाखला देत साहित्यिक आणि संमेलनाध्यक्षांना चार शब्द सुनावले. शरद पवार यांनी साहित्यिकांना दिलेला सल्ला योग्यच आहे. खरंतर साहित्य संमेलन हे एक पावित्र्य आहे. समाजाला दिशा देणारं हे व्यासपीठ आहे. ज्या प्रमाणे विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारकरी वारीवर निघतो त्याचप्रमाणे ही साहित्यप्रेमींची वारी आहे. त्यामुळे याचं पावित्र्य साहित्यकांनी जपलं पाहिजे. साहित्यिकांनी साहित्यावर वाद घालावेत पण इतर वादांपासून दूर राहावं असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला.

आज सोशल मीडिया हे साहित्यासाठी नवं व्यासपीठ आहे. ट्विटर संमेलन या हॅशटॅग खाली ट्विटर साहित्य संमेलन भरलंय. एवढंच नाही तर जवळपास 12 हॅशटॅग मराठी साहित्यासाठी धडपड करत आहे. त्यांनी सुरू केलं कार्य हे स्वागतार्ह असून यामध्ये साहित्यिकांनी सहभाग घेतला पाहिजे असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं. विचारांना कुणीच संपवू शकत नाही.

हा देश सहिष्णु आहे आणि सहिष्णुच राहिलं. त्यामुळे साहित्यकांनी समाजाला, आम्हाला विचार आणि दिशा देण्याचं कार्य करत राहावं असा सल्ला देत मुख्यमंत्र्यांनी भाषणाचा सांगता केली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 16, 2016 04:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close