S M L

वयस्कर तरुणाशी बालविवाह 'ती'ने उधळून लावला, थेट गाठले पोलीस स्टेशन !

Sachin Salve | Updated On: Jan 21, 2016 07:01 PM IST

वयस्कर तरुणाशी बालविवाह 'ती'ने उधळून लावला, थेट गाठले पोलीस स्टेशन !

पुणे - 21 जानेवारी : पुण्यातल्या मंगळवार पेठेत एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावण्याचा प्रयत्न स्वतः मुलीनंच उधळून लावला आहे.या मुलीने पोलीस महिला सहाय्यता विभागाची मदत घेवून स्वतःच्या बालविवाहाचा प्रयत्न हाणून पाडला.

संबंधित मुलीला तिच्या वडलांकडून एका वयस्कर तरूणाशी लग्न करण्याची बळजबरी करण्यात येत होती. मुलीनं लग्न कराव म्हणून तिच्या पालकांनी तिच्यावर पाळत ठेवून तिला मारहाणही केली. सदर मुलगी सुशिक्षित असल्यानं तिनं तिच्या आजीच्या सहाय्यानं पोलीस महिला सहायत्ता कक्षाशी संबंध साधला आणि हा बालविवाह रोखला. या मुलीनं तिच्या पालकांच्या विरोधात आणि होणाऱ्या नियोजित पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यास नकरा दिल्यानं पोलिसांनी दोन्ही पक्षाचं समुपदेशन करून ह्या प्रकरणाला पुर्णविराम लावला. भविष्यात देखिल या मुलीला महिला सहाय्यता कक्षाकडून वेळोवेळी मदत करण्यात येणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 21, 2016 07:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close