S M L

शरद पवार यांची प्रकृत्ती उत्तम, उद्या संध्याकाळी मिळणार डिस्चार्ज

Sachin Salve | Updated On: Jan 26, 2016 06:31 PM IST

pawar on amir3पुणे - 26 जानेवारी : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दोन दिवसांपासून पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल आहेत. नुकतचं त्यांच मेडीकल बुलेटीन आलं असून त्यांची प्रकृती उत्तम असल्याचं रूबी हॉल क्लिनिकचे डॉक्टर संजय पठारे यांनी सांगितलंय. उद्या संध्याकाळी त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल असं पठारे यांनी सांगितलं.

दोन दिवसांपूर्वी पवारांना अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. माईल्ड फ्लुईडचा त्रास होत असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काळजी करण्याचं काही कारण नाही, देखरेखीखाली ठेवण्यासाठी त्यांना आणखी एक दिवस रुग्णालयात ठेवलं आहे. त्यांनंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 26, 2016 05:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close