S M L

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर आज 15 मिनिटांचा ब्लॉक

Samruddha Bhambure | Updated On: Jan 27, 2016 11:39 AM IST

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर आज 15 मिनिटांचा ब्लॉक

मुंबई– 27 जानेवारी :  मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर आज (बुधवारी) खंडाळ्यातील अमृतांजन पुलाजवळील सैल दरडी काढण्यासाठी, तसंच संरक्षक लोखंडी जाळ्या बसवण्याच्या कामासाठी दर 15 मिनिटांनी ब्लॉक घेतला जाणार आहे.

बुधवारी दुपारी 12 ते 4 याकालावधीत काम करण्यात येणार आहे. बारा ते सव्वा बारा, त्यानंतर एक ते सव्वा, दोन ते सव्वा दोन अशा पद्धतीने दर 15 मिनिटांनंतर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

गेल्या वर्षी खंडाळा बोगदा ते आडोशी बोगदा या आठ किलोमीटरर अंतरावर एका महिन्यात 5 वेळा दरडीच्या घटना घडल्या होत्या. यामुळे एक्स्प्रेस-वेने प्रवास करणार्‍या प्रवाशांना सुरक्षित प्रवास करणे धोकादायक बनले होते. काही महिन्यांपूर्वी या मार्गावर दरडदुरुस्तीचं काम करण्यात आलं होतं. आता पुन्हा धोकादायक दरडी काढण्याचं काम केलं जात आहे.

यादरम्यान, मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. तर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबईकडून पुण्याला जाणारी वाहतूक ही जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वळवण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईहून पुण्याकडे जाणार्‍या गाड्यांवरच याचा थोडासा परिणाम होईल पण पुण्याहून मुंबईकडे जाणार्‍या गाड्यांवर याचा काही परिणाम होणार नाहीय.

दरम्यान, या काळात प्रवाशांनी एक्सप्रेस वे वर प्रवास करणं टाळण्याचा सल्ला महामार्ग वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे. 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 27, 2016 11:39 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close