S M L

माता न तू वैरणी, दीड वर्षांच्या चिमुरडीची विष पाजून हत्या

Sachin Salve | Updated On: Feb 6, 2016 01:41 PM IST

crimeपुणे - 06 फेब्रुवारी : पुण्यातील वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत आई नावाला काळिमा फासणारी घटना घडली आहे. अनिता साबळे या महिलेने आपल्या दीड वर्षांच्या मुलीला विष पाजून हत्या केली आहे.

अक्षता या आपल्या मुलीला विष पाजल्यानंतर तिच्या आईने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न फसला आणि तिन लगेच घरातून पळ काढला. घरगुती वादातून अनिताने अक्षताचा खून केला असावा अस पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

वारजे पोलिसांनी अक्षताची आई अनिता साबळे विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी अनिता साबळे हिला अटक करण्याचा प्रयत्न केला. मात्र ती सध्या वारजे भागातील एका रुग्णालयात दाखल झाली असल्याने तिला आतापर्यंत तरी अटक करण्यात आली नाही असं वारजे पोलिसांनी सांगितलं. वारजे पोलीस या घटनेचा पुढचा तपास करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 6, 2016 01:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close