S M L

हेल्मेटसक्ती करायला ही काय मोगलाई आहे का? -राज ठाकरे

Sachin Salve | Updated On: Feb 6, 2016 09:57 PM IST

raj thackaey pcपुणे - 06 फेब्रुवारी : चांगले रस्ते न देता, चांगले फुटपाथ न देता अचानक हेल्मेटसक्तीचा निर्णय का घेण्यात आला. ही काय मोगलाई आहे का ? असा परखड सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय. मनसेचा हेल्मेटसक्तीला विरोध असून या विरोधात आंदोलन करणार असंही राज ठाकरेंनी स्पष्ट केलं.

राज्यभरात पुन्हा एकदा हेल्मेटसक्ती लागू करण्यात आलीये. औरंगाबादपाठोपाठ पुण्यात याची अंमलबजावणी केली जात आहे. पण पुणेकरांनी हेल्मेटसक्तीच्या निर्णयाचं स्वागत केलं खरं पण मुदतीची मागणीही केली. दुसरीकडे मनसेनं हेल्मेटसक्तीला कडाडून विरोध केलाय. काँग्रेस सरकार होतं त्यावेळी त्यांनी निर्णय घेतला होता. तेव्हा भाजपवाले विरोध करत होते. पुण्यात तर हेल्मेटची अंत्ययात्राही काढली होती. आता हेच असे निर्णय का घेत आहे. लोकांना आधी सुविधा द्या. चांगले रस्ते न देता,चांगले फुटपाथ न देता अचानक हेल्मेटसक्तीचा निर्णय का घेण्यात आला. ही काय मोगलाई आहे का ? असा सवाल राज ठाकरे यांनी केला.

तसंच हेल्मेट असावे पण लोकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. शहरात वाहनांचा फारसा स्पीड नसतो. हायवेवर गाड्यांचा जेवढा स्पीड असतो तसा स्पीड शहरात नसतो. हेल्मेट घातल्यावर न ऐकता येत. नाही मागे वळून पाहता येत. मुळात हेल्मेट कंपन्यांच्या हितासाठी हे सर्व काही सुरू आहे का असा संशय आता येऊ लागला आहे. या कंपन्या कुणाच्या आहे हे ही पाहावं लागेल असंही राज ठाकरे म्हणाले. तसंच भाजप विरोधात असताना ज्या गोष्टी चुकीच्या वाटल्या त्या सत्तेत आल्यावर योग्य वाटतायेत, हेच सत्तेचं शहाणपण आहे का? असा सवालही राज यांनी उपस्थित केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 6, 2016 05:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close