S M L

हेल्मेटसक्ती ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी- दिवाकर रावते

Samruddha Bhambure | Updated On: Feb 7, 2016 08:13 PM IST

हेल्मेटसक्ती ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी- दिवाकर रावते

पुणे – 07 फेब्रुवारी : राज्यात झालेल्या हेल्मेट सक्तीला पुण्यामध्ये जोरदार विरोध होत आहे. याच पार्श्वभूमीवर हेल्मेट विरोधक आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यामध्ये बैठक झाली. पण हेल्मेट सक्तीवर दिवाकर रावते ठाम आहेत. हेल्मेट सक्ती ही फक्त पुण्यात नाही, तर संपूर्ण राज्यात आहे, अशी प्रतिक्रिया दिवाकर रावतेंनी या बैठकीत दिली आहे.

हेल्मेटसक्तीबाबत पुणेकरांच्या भावना समजून घेण्यासाठी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आज (रविवारी) तातडीची सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना, पुणे कोर्टाच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यात हेल्मेट सक्ती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य सरकार आणि प्रशासनामार्फत त्याचे पालन करण्यात येत आहे. तसंच हेल्मेट सक्ती रद्द करण्यासाठी नियमावली करुन केंद्राकडे पाठवावी लागणार आहे. याबाबत राज्य सरकार थेट निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळे विधी विभागाच्या सचिवांशी चर्चा करणार, असल्याचं राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी म्हटलं. त्यांच्या विधानामुळे चर्चेतून काहीही निष्पन्न झालं नसलं तरी पुणेकरांच्या भावना कोर्टापर्यंत पोहोचवणार असल्याचं रावतेंनी स्पष्ट केलं आहे. त्याचंबरोबर, हेल्मेटची आवश्यकता पुणेकरांनी नाकारली नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. तसंच महामार्ग आणि मोठ्या रस्त्यांपुरती कारवाई असावी आणि शहरातले गल्ली बोळ आणि अरुंद रस्त्यांकरता शिथिल कारवाई करावी, असा तोडगा निघण्याची शक्यता असल्याचं सूत्रांची माहिती आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 7, 2016 05:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close