S M L

पुण्यातून अमेरिकेतील नागरिकाला ऑनलाईन लुटलं, तिघे अटकेत

Sachin Salve | Updated On: Feb 10, 2016 11:45 AM IST

पुण्यातून अमेरिकेतील नागरिकाला ऑनलाईन लुटलं, तिघे अटकेत

cyber_crime23पुणे - 10 फेब्रुवारी : पुणे सायबर सेलनं पुण्यातून थेट अमेरिकेच्या नागरिकांना गंडा घालणार्‍या बिपीओ चालकाला अटक केलीये. पिंपरीत राहणार्‍या आदित्य राठी,हरीश खुशलानी, रितेश नवानी या तिघांना अटक करण्यात आलीये. या तिघांविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.

पुण्यात बिपीओ सुरू करून मायक्रोसॉफ्टच्या नावाने संगणक दुरुस्तीचे काम करत असल्याच सांगून थेट अमेरिकेत नागरिकांना संपर्क साधत होते. फोनवर संपर्क केलेल्या अमेरिकेच्या नागरिकांना तुमच्या संगणकामध्ये बिघाड झाला असून मायक्रोसॉफ्टकडून दुरुस्तीचे काम करून देण्यासाठी फोन केला असल्याच सांगण्यात येत होतं.

हे फोन व्हॉइस इंटरनेट प्रोटोकॉलवरून करून ते अमेरिकेतूनच केल्याचं भासवण्यात येत होतं. आणि त्यानंतर लोकांकडून काही जुजबी माहिती घेतली जात होती. आणि 'टीमव्हीवर' नावाच्या सॉफ्टवेअरद्वारे त्यांच्या संगणकामधील बँकेशी संबंधित माहिती चोरून त्याद्वारे थेट अनेक डॉलर वेगवेगळ्या खात्यांवर वर्ग करून घेतले असल्याचं उघड झालंय.

या प्रकरणी पोलिसांनी पिंपरीत राहणार्‍या आदित्य राठी,हरीश खुशलानी ,रितेश नवानी यांना सायबर सेलने अटक केलीये. या तिघांनी अमेरिकेच्या नागरिकांची माहिती चोरून त्याचा गैरवापर करून डॉलर मध्ये पैसे मिळवल्याबद्दल त्यांच्यावर माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून या अशा पद्धतीने थेट परदेशी नागरिकांची फसवणूक करण्याचा हा पहिलाच गुन्हा उघडकीस आलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 10, 2016 11:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close