S M L

माझ्यावर सर्व आरोप खोटे, चौकशीला घाबरत नाही -अजित पवार

Sachin Salve | Updated On: Feb 13, 2016 07:32 PM IST

ajit pawar ncpeपुणे - 13 फेब्रुवारी : सिंचन घोटाळ्यात माझ्यावर झालेले भ्रष्टाचाराचे सर्व आरोप खोटे असून आपण कोणत्याही प्रकारच्या चौकशीला तयार असल्याचं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी स्पष्ट केलंय. ते पिंपरी चिंचवडमध्ये बोलत होते.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारने राज्यातल्या 66 प्रकल्पांची पुन्हा नव्याने चौकशी सुरू केलीय. या प्रकल्पांना मंजुरी देताना अनियमितता झाल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. त्यामुळे अजित पवार पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झालीय. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी आपण चौकशीला घाबरत नसल्याचं म्हटलंय. सिंचन प्रकल्पाबाबत करण्यात येणारे सर्व आरोप एकतर्फी असल्याचे सांगत, तत्कालीन सरकारने उभारलेले सर्व प्रकल्प राज्यपालांच्या अधिकारांनुसार राबवल्या गेल्याची माहिती देत, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिंचन घोटाळ्याबाबत आपल्यावर होणार्‍या आरोपांवरून पहिल्यांदाच संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार, सिंचन प्रकल्पातील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीचं आपण स्वागत करतो आणि चौकशीलाही आपण सामोर जाणार मात्र, समिती न सर्व बाजू तपासाव्या असं आवाहन अजित पवार यांनी केलं.

दरम्यान, अण्णाभाऊ साठे महामंडळातील भ्रष्टाचाराबाबत समाजकल्याण मंत्री दिलीप कांबळे यांनी केलेल्या आरोपाबाबत आपण बोललो तर त्याची हेडलाईन केली जाईल. त्यामुळे आपण त्या विषयी अधिक बोलणार नसल्याचं सांगत अजित पवार यांनी कांबळेंनी केलेल्या आरोपांना अशी मिश्किल बगल दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 13, 2016 07:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close