S M L

पिंपरी चिंचवडमध्ये अग्नितांडव, गोडाऊनला लागली भीषण आग

Sachin Salve | Updated On: Feb 23, 2016 07:29 PM IST

पिंपरी चिंचवडमध्ये अग्नितांडव, गोडाऊनला लागली भीषण आग

पुणे - 23 फेब्रुवारी : पिंपरी चिंचवडमधल्या चिखली भागातील एका भंगार गोडाऊनला भीषण आग लागली. अग्निशमन दलाचे 5 बंब घटनास्थळाकड़े रवाना झाले आहेत. पण आग अजूनही आटोक्यात आलेली नाही. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, लाखोंचं नुकसान झालंय.

आज दुपारी कुदळवाडी परिसरातील एका गोडाऊनला अचानकपणे आग लागली. या गोडाऊन शेजारीच वखरा असल्यामुळे काही क्षणात आगीने रौद्ररूपधारण केलं. वखार शेजारी असल्यामुळे आगची भडका आणखी उडालाय. या आगीच्या धुराचे लोट दूरवर पसरले असून धुरामुळे परिसर काळवंडला आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. मात्र या धुरांच्या लोटांमुळे नागरिकांना त्रास होतोय. ही आग कशामुळे लागली ते अजूनही स्पष्ट झालेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 23, 2016 07:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close