S M L

महिला, लिफ्ट आणि पोलीस !, लुटारू पोलिसांचा असा झाला पर्दाफाश

Sachin Salve | Updated On: Feb 23, 2016 11:02 PM IST

mhapoliceपुणे - 23 फेब्रुवारी : बेरात्री एका महिलेला एकटी आहे म्हणून लिफ्ट दिली जाते...पुढे जाऊन तीच महिला छेडछाड करतो म्हणून 1 हजाराची मागणी करते...तिच्या जाचातून सुटण्यासाठी 'तो' पोलीस स्टेशन गाठण्याची धमकी देतो...कशीबशी महिलेच्या तावडीतून सुटका होते...पण घरी गेल्यावर पोलीसच त्याच्याकडून 70 हजार रुपये लुबाडता..एखाद्या सिनेमात घडावं असं नाट्य पुण्यात घडलं. 'सदरक्षणाय, खलनिग्रहणाय' पोलिसांच्या या ब्रीद वाक्याला तडा देणारी घटना पुण्यात घडली आहे.

घडलेली हकीकत अशी की, तक्रारदार सौरभ राय हे 16 तारखेच्या रात्री मित्रांसोबत जेवून घरी परत जात असताना एका महिलेने त्यांना लिफ्ट मागितली. या महिलेस लिफ्ट दिल्यानंतर काही अंतरावर तिने गाडी थांबवायला सांगून सौरभ यांच्याकडे 1 हजार रूपयांची मागणी केली आणि पैसे दिले नाहीतर पोलिसांकडे छेडछाड तक्रार करू असा दम ही दिला. सौरभने वेळीच भान राखत या मुलीला पोलीस चौकीत येण्याची विचारणा केली. त्यानंतर मात्र या महिलेने तिथून काढता पाय घेतला. मात्र, घरी पोहोचताच त्यांच्याकडे मुख्यालयात काम करणार्‍या पोलीस राजेश नाईक आणि दीपक रोमाडे यांनी आम्ही बंडगार्डन पोलीस ठाण्यातील पोलीस असून तुमच्या विरोधात एका महिलेची तक्रार आली आहे, असे कळविले.

या तक्रारीनुसार तुझ्यावर केस होऊ शकते. आम्हाला तुझ्यावर केस करायला आवडणार नाही, असे सांगून केस दाखल न करण्यासाठी 1 लाख 10 हजार रुपयांची मागणी केली तडजोडीनंतर त्यांच्याकडून 75 हजार रुपये द्यायला भाग पाडलं. या वरिष्ठ अधिकार्‍यांना माहिती दिल्यानंतर या पोलिसांची चौकशी करून त्यांना तत्काळ अटक करायचे आदेश देण्यात आले त्यानुसार आरोपींना बंडगार्डन पोलिसांनी अटक केलीये.

रात्रीच्या वेळी एकट्याने प्रवास करत असताना अनोळखी व्यक्तीला लीफ्ट देणे किती महागात पडू शकते हे या प्रकरणातून दिसून येते. त्यामुळे पुणे पोलिसांनी नागरिकांना सावध रहाण्याचे आव्हान केलं खरं पण पोलिसांनीच संगनमत करून गुन्हे करायच्या या नवीन पद्धतीमुळे लिफ्ट देताना दोन वेळा मात्र विचार करा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 23, 2016 11:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close