S M L

पुण्यात तरुणीवर सहकार्‍यांकडून सामूहिक बलात्कार

Sachin Salve | Updated On: Feb 28, 2016 04:15 PM IST

rape_634565पुणे - 28 फेब्रुवारी : हनुमान टेकडीवर विद्यार्थिनीवर बलात्काराची घटना ताजी असताना आणखी एक बलात्काराच्या घटनेनं पुण्याला हादरा दिलाय. पार्टीला गेलेले असताना तिच्या मित्रांनी दारूच्या नशेत गुंगीचे औषध देऊन 24 वर्षी तरुणीवर अत्याचार केला. या प्रकरणी पाच जणांना ताब्यात घेण्यात आलाय.

हिंजवडी आयटीमध्ये काम करणार्‍या 24 वर्षीय पीडित तरुणीही आपल्या कार्यालयातील मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेली होती. त्यावेळी मद्यप्राशन केलेल्या तिच्या मित्रांनी बळजबरीने मद्यप्राशन करण्याचा प्रयत्न केला. तिच्या मद्याच्या ग्लासमध्ये गुंगीचे औषध टाकले. बेशुद्ध झालेल्या तरुणीवर प्रथम तिच्या मित्राने आणि त्यांनंतर त्याच्या सहकार्‍यांनी अत्याचार केला. ही तरुणी मुंढवा परिसरातील आहे. तिच्यावर ससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. पोलिसांनी पाचही नराधमांना ताब्यात घेतलंय. या प्रकरणामुळे कार्यालयात काम करणार्‍या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 28, 2016 04:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close