S M L

दौंड स्टेशनजवळ हावडा एक्स्प्रेसवर सशस्त्र दरोडा, दोन महिला जखमी

Sachin Salve | Updated On: Mar 1, 2016 12:22 PM IST

दौंड स्टेशनजवळ हावडा एक्स्प्रेसवर सशस्त्र दरोडा, दोन महिला जखमी

पुणे - 01 मार्च : दौंड स्टेशनजवळ हावडा एक्स्प्रेसवर सशस्त्र दरोडा टाकण्यात आलाय. दोन ते तीन दरोडेखोरांनी पहाटे पाचच्या सुमारास हा दरोडा टाकला. दरोडेखोरांच्या या हल्ल्यात हल्ल्यात आई आणि मुलगी जखमी झालीये. दरोडेखोरांनी मोबाईल फोन आणि आयडी कार्ड हिसकावून नेले आहे. जखमी महिलांवर दौंडच्या खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहे.

हावडा एक्स्प्रेस दौंड स्टेशनजवळ पोहचत असतांना नगर आवटरला थांबली होती. याचा डाव साधत सात ते आठ दरोडेखोरांनी हावडा एक्स्प्रेसमध्ये धुमाकूळ घातला. दरोडेखोरांनी काही प्रवाशांना शस्त्राचा धाक दाखवत तर काही प्रवाशांना जखमी करत लूट केलीये. प्रवाशांना मारहाण करून दागिने आणि पैसेही लुटले. त्यांना प्रतिकार करणार्‍या दोन महिला जखमी झाल्यात. दौंड स्टेशनवर तीन प्लॅटफॉर्म खाली होते तरीही रेल्वे आधीच का थांबवण्यात आली असा सवाल करत संतप्त प्रवाशांनी स्टेशन मास्तरला घेराव घातला. या प्रकरणाचा रेल्वे पोलीस अधिक तपास करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 1, 2016 12:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close