S M L

लग्नाचं आमिष दाखवून मॉडेलवर बलात्कार

Sachin Salve | Updated On: Mar 6, 2016 09:57 PM IST

Rape case2पुणे - 06 मार्च : टीव्ही कलाकार आणि मॉडलिंग क्षेत्रात काम करणार्‍या एका 25 वर्षांच्या तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पिंपरी चिंचवड़ शहरातील भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये संकेत आणि मयूर लांडे या दोघा भावांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

या घटनेतील पीडित तरुणी आणि आरोपी संकेतचे मागील 3 वर्षांपासून प्रेम संबंध होते. त्यातून दोघांनी लग्न करण्याचे ठरवले होते. पण मुलाने लग्नाला नकार दिला. एवढंच नाही तर आपल्याला मारहाण केली आणि भावाने आपल्याला जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार पीडित मुलीने केली आहे. त्या आधारावर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपी हा एका बड्या आसामीचा मुलगा आणि एका मोठ्या राजकीय वक्तीचा जवळचा नातेवाईक असल्याने पोलीस अत्यंत काळजीपूर्वक हे प्रकरण हाताळत असल्याची माहिती मिळतीय. दरम्यान, या सर्व प्रकाराने पीड़ित तरुणी प्रचंड भेदरली असून सध्या तिच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 6, 2016 09:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close