S M L

फर्ग्युसन कॉलेजमध्ये देशविरोधी घोषणा, पोलिसांत तक्रार

Sachin Salve | Updated On: Mar 23, 2016 10:39 AM IST

फर्ग्युसन कॉलेजमध्ये देशविरोधी घोषणा, पोलिसांत तक्रार

पुणे - 23 मार्च : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात देशविरोधी घोषणा प्रकरणानंतर पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्येही देशविरोधी घोषणा दिल्याची घटना घडलीये. या प्रकरणी फर्ग्युसन कॉलेजच्या प्राचार्यांनी पोलिसांत तक्रार केली असून कडक कारवाईची मागणी केलीये.

पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये जेएनयूमध्ये काय घडलं हे सांगण्यासाठी अभाविपचा नेता आलोक सिंग आला होता. या कार्यक्रमालाPUNE FARGUSAN COLLEGE LETTER कॉलेज प्रशासनाने परवानगी दिली नव्हती तरीही हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम सुरू असतांना आंबेडकरी चळवळीतील काही विद्यार्थी तिथे पोहचले आणि त्यांनी कार्यक्रमाला रितसर परवानगी घेतली का ? अशी विचारणा केली.

त्यामुळे अभाविप आणि आंबेडकरी चळवळीतील विद्यार्थ्यांमध्ये बाचाबाची झाली आणि याला घोषणाबाजीला स्वरुप आलं. "अभाविप चले जाओ", "कितने रोहित मारोगे, घर घर से रोहित निकलेगा" अशा घोषणा आंबेडकरी चळवळीतील विद्यार्थ्यांनी दिल्या. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी वंदे मातरम्‌च्या घोषणा दिल्यात.

पोलिसांनी परिस्थिती पाहता अभाविपचा कार्यक्रम बंद केला. फर्ग्युसनचा विद्यार्थी सुजाता आंबेडकरला पोलिसांनी दुसरीकडे घेऊन जायचा प्रयत्न केला. त्यावेळी काही काळ तणाव निर्माण झाला होता.

या घोषणाबाजी प्रकरणी अभाविप आणि फर्ग्युसन कॉलेजने पोलिसांमध्ये पत्राद्वारे तक्रार दिलीये. फर्ग्युसन कॉलेजच्या प्रशासनानं विद्यार्थ्यांची घोषणाबाजी आणि आयोजित कार्यक्रमाच्या विरोधात डेक्कन जिमखाना पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे.

देशविरोधी घोषणा देणार्‍यांवर कडक कारवाई करा अशी मागणी फर्ग्युसन कॉलेजच्या प्राचार्यांनी केलीये. मात्र, कोणा एकाच्या विरोधात ही तक्रार नसल्यानं देशविरोधी घोषणा कुणी दिल्यात हे स्पष्ट होऊ शकलं नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 23, 2016 10:39 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close