S M L

पुण्यात पुन्हा जळीतकांड, 9 वाहनं जळून खाक

Sachin Salve | Updated On: Mar 30, 2016 05:26 PM IST

पुण्यात पुन्हा जळीतकांड, 9 वाहनं जळून खाक

पुणे - 25 मार्च : पुण्यात गाड्यांना आग लावण्याचे विकृत प्रकार सुरूच आहेत. एरंडवणे भागात मध्यरात्रीनंतर 9 दुचाकी वाहनांना आग लावण्यात आली, आणि यात या बाईक्स जळून खाक झाल्या आहेत. एरंडवणेच्या राजमयूर सोसायटीतली ही घटना आहे.

राजमयूर सोसायटीत 9 दुचाकी वाहनांना आग लावण्यात आली. हा प्रकार इथेच संपत नाही. बाईक्सना लागलेल्या आगीचे लोट इमारतीच्या पहिल्या मजल्यापर्यंत जात होते. पण अग्निशमन दलाचे जवान वेळेवर पोहोचले आणि त्यांनी तातडीनं आग विझवल्यामुळे पुढचा अनर्थ टळला.पोलिसांचा तपास सुरू आहे. प्रश्न हा आहे की ज्या लोकांना आपण ओळखतही नाही, त्यांच्या दुचाकी पेटवून या विकृत लोकांना काय मिळतं किंवा त्यांना काय सिद्ध करायचं असते, हे कोडंच आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 25, 2016 09:17 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close