S M L

पुण्यात कन्हैयाकुमारचा 14 एप्रिलला कार्यक्रम नको, आंबेडकरवादी संघटनांचा विरोध

Sachin Salve | Updated On: Apr 1, 2016 12:44 PM IST

KANHAIYA-KUMAR-facebookपुणे - 01 एप्रिल : 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 125 वी जयंती आहे आणि याच दिवशी पुणे शहरात कन्हैया कुमार याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 14 एप्रिलला कन्हैया कुमारचा पुण्यात कार्यक्रम आयोजित करण्यामागे षड्‌यंत्र आहे असं काही आंबेडकरवादी संघटनांचं म्हणणं आहे. कन्हैया कुमारच्या पुणे शहरातील कार्यक्रमाला भाजपा युवा मोर्चानेही विरोध केला आहे.

कन्हैया कुमारला शहरात विरोध होत असल्याने डाव्या आणि उजव्या विचार सरणीच्या सघटनात तेढ़ निर्माण होउन शहरातील आंबेडकरवादी जनेतच्या उत्साहाच्या कार्यक्रमाला गालबोट लागू शकतो, म्हणून कहैंन्या कुमारचा 14 एप्रिलचा पुण्यातील कार्यक्रम 14 एप्रिलनंतर कधीही आयोजित करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्ष दलित आघाडी, भीम शक्ती संघटना, लष्करे ए भीमा आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर महोत्सव समितीने केली आहे. कन्हैया कुमारचा 14 एप्रिलचा पुण्यातील कार्यक्रम रद्द करावा म्हणून त्याची दिल्लीत जाऊन भेट घेणार असं यावेळी भीम शक्ती संघटनेचे अरुणदादा भालेराव यांनी सांगितलं. फर्ग्युसन काॅलेज आणि रानडे इन्सिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी कन्हैया कुमारला बोलावून पुण्यात कार्यक्रम घेणार असल्याचं जाहीर केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 1, 2016 12:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close