S M L

एकतर्फी प्रेमातून तरुणाची कारमध्ये स्वत:ला पेटवून आत्महत्या

Samruddha Bhambure | Updated On: Apr 9, 2016 04:31 PM IST

एकतर्फी प्रेमातून तरुणाची कारमध्ये स्वत:ला पेटवून आत्महत्या

e11df753-5084-4417-87ae-b0dd391e5900

पुणे - 09 एप्रिल : एकतर्फी प्रेमातून 25 वर्षांच्या तरूणाने स्वत:ला कारमध्ये जाळून घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील हदपसर परिसरात घडली आहे. अजित इंगळे असं या आत्महत्या केलेल्या तरूणाचं नाव आहे. हडपसर इथल्या ग्लायडिंग सेंटरजवळ सकाळी साडे सहाच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली.

अजित याचं हडपसर इथल्या एका मुलीवर एकतर्फी प्रेम होतं. त्यातून आलेल्या नैराश्यातून त्याने सासवड रस्त्यावर ओमीनी कारची दारे बंद करून गाडी पेटवून दिली. या घटनेत तो गंभीर जखमी होवून त्याचा मृत्यू झाला.

घटना घडण्यापूर्वी तो ग्लायडिंग सेंटरच्या गेटसमोर गाडी पार्क करून थांबला होता. यावेळी महापालिकेच्या सफाई कर्मचार्‍यांनी स्वच्छता करावयाची होती. त्यामुळे अजितला गाडी बाजूला घेण्यास सांगितलं. त्यावेळी त्याने गाडी बंद पडली असल्याचे सांगून पुण्याच्या दिशेला असणारी गाडी त्याने सासवडच्या बाजूने प्राची हॉटेलपर्यंत ढकलत नेली. त्यानंतर तो गाडीत बसला. यावेळी अचानक गाडीने पेट घेतला.

दरम्यान, गाडी गॅसवर चालणारी असल्याने शॅर्टसर्कीटमुळे गाडीला आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांचा होता. मात्र तपास सुरू असताना अजितने एकतर्फी प्रेमातून गाडीला आग लावून आत्महत्या केल्याचे निष्पन्न झालं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 9, 2016 02:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close