S M L

पुण्यात एकाच रात्री जळीतकांडाच्या दोन घटना

Samruddha Bhambure | Updated On: Apr 22, 2016 12:14 PM IST

पुण्यात एकाच रात्री जळीतकांडाच्या दोन घटना

Pune Firedas

पुणे - 22  एप्रिल : पुण्यात एकाच रात्री दोन वेगवेगळ्या ठिकाणी वाहनांच्या जळीतकांडाची घटना घडली आहे. वाघोलीत सहा ट्रक तर शुक्रवार पेठेत सहा दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. वाघोली इथल्या उबाळेनगर परिसरात बाबूभाई गॅरेजमध्ये सहा ट्रक आगीत जळून खाक झाले आहेत. काल मध्यरात्री अडीच तीनच्या दरम्यान ही घटना घडली. दरम्यान, अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने पोहचल्याने आग लगेच आटोक्यात आली. मात्र, तोपर्यंत यात दहा ट्रक जळून खाक झाली. तर दुसरीकडे शुक्रवार पेठ पोलीस चौकीसमोरील रात्री 3.30च्या सुमारास 7 दुचाकी जळून खाक खाक झाल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे पोलीस चौकीसमोरच हे जळीतकांड घडलं आहे. या आगीचंही कारण अद्याप समजलेलं नाही. मात्र एकाच रात्री दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटनांमुळे पुणेकरांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 22, 2016 09:27 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close