S M L

व्हॉट्सअॅप ग्रुपचं नावं बदललं म्हणून तरुणाला बेदम मारहाण

Sachin Salve | Updated On: Apr 23, 2016 08:58 PM IST

व्हॉट्सअॅप ग्रुपचं नावं बदललं म्हणून तरुणाला बेदम मारहाण

पुणे - 23 एप्रिल : व्हॉट्सअॅपवर मित्राच्या वाढदिवसाआधीच ग्रुपचं नाव का बदललं ? या क्षुल्लक कारणावरून व्हॉटस्‌ऍप ग्रुपमधील मित्रांनीच आपल्या मित्राला बेदम मारहाण केल्याची घटना पुण्यात घडलीये.

गरवारे महाविद्यालयात बीबीए शाखेत शिकणारा अक्षय दिनकर हा विद्यार्थी मित्राच्याच मारहाणीत गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी शुभम घांगुर्डे, हर्षद चौघुले, रोहन पेठकर, अनिरूद्ध भालेराव, सुमित बाटुंगे या विद्यार्थ्यांना अटक केली असून त्यांच्यावर कलम 143,147,148,149,307 (खुनाचा प्रयत्न),323 अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय. शुक्रवारी दुपारी महाविद्यालयात परिक्षेच्या आधी अक्षयशी बोलण्यासाठी हर्षद चौगुले आणि रोहन पेटकर गेले. त्यावेळी त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर अक्षय आणि त्याचा मित्र बिल्डिंगखाली निघून आले. पण संतापलेल्या त्याच्याच मित्रांनी हर्षद,रोहन यांच्याबरोबरच कॉलेजबाहेर ची काही मुलं आणून अक्षयला बेदम मारहाण केली. जखमी अक्षयवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 23, 2016 08:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close