S M L

ऐन दुष्काळात पुण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेविकेनं घातला मुलाच्या शाही लग्नाचा घाट

Sachin Salve | Updated On: Apr 27, 2016 01:54 PM IST

ऐन दुष्काळात पुण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेविकेनं घातला मुलाच्या शाही लग्नाचा घाट

पुणे - 26 एप्रिल : मराठवाड्याला दुष्काळाने होरपळतोय. हंडाभर पाण्यासाठी लोकांना वणवण भटकावं लागतं आहे. एवढंच नाहीतर कित्येक बळीराजाच्या घरी मुलींची लग्न रखडलीये. अशा परिस्थिती लोकप्रतिनिधीनीच भान न बाळगल्याचं समोर आलंय. पुण्यातील कात्रजमध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेविका भारती कदम यांनी आपल्या मुलाच्या शाही लग्नाचा घाट घातलाय.

पुण्यातील कात्रज कोंढवा भागात सध्या चर्चा आहे ती एका आलिशान शाही विवाह सोहळ्याची. पुणे महानगर पालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका भारती कदम आणि त्यांचे पती प्रेरणा फाऊंडेशनचे संस्थापक प्रकाश कदम यांच्या मुलाचं लग्न बुधवार 27 एप्रिल ला पार पडतंय. या लग्नाकरता सिनेमात शोभेल असा भव्य सेट तयार करण्यात आलाय.

भव्य अशी रोशनाई करून सप्तरंगाची उधळण करण्यात येत आहेत. एकरभर जागेत मोठमोठे मांडव घालण्यात आलेत त्यात जेवणाची तयारी सुरू आहे. पाहुणे, आमंत्रित लोकांकरता पुर्‍या तळल्या जात आहेत, बुंदी पाडली जातेय. सध्या राज्यात अभूतपूर्व दुष्काळ,पाणी टंचाई आहे.

विशेष म्हणजे, हायकोर्टानही सरकारला आयपीएल मॅचवरून फटकाराताना एप्रिल-मे मध्ये होणार्‍या आलिशान विवाह सोहळ्यावर लक्ष ठेवा असं बजावलंय. खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी वारंवार मसापच्या कार्यकरर्त्यांना दुष्काळी स्थितीचं भान ठेवा,उधळपट्टी करू नका असं सांगितलंय. पण, लोकप्रतिनिधीच बेपर्वा असल्याचं सातत्यानं समोर येतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 27, 2016 01:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close