S M L

पुण्यात खडकवासलातून सोडलेल्या पाण्यात बुडून 2 चिमुरड्यांचा मृत्यू

Samruddha Bhambure | Updated On: May 6, 2016 10:15 AM IST

पुण्यात खडकवासलातून सोडलेल्या पाण्यात बुडून 2 चिमुरड्यांचा मृत्यू

05 मे : पुण्यातील खडकवासला धरणातून दौंड आणि इंदापूरसाठी सोडलेल्या पाण्यात दोन चिमुकले वाहून गेल्याने एकच खळबळ उडाली आहे.

खडकवासला धरणातून दौंड आणि इंदापूरसाठी 1 टीएमसी पाणी सोडण्याचा बुधवारी दुपारी 12 वाजता पाणी सोडण्यात आलं. मात्र, हे पाणी सोडण्यापूर्वी कालव्याच्या आजूबाजूच्या परिसरात पाणी येत असल्याची दवंडी द्यावी लागते, ज्यामुळे कालव्यात असलेल्या किंवा आजूबाजूच्या लोकांना सतर्क राहता येतं. मात्र बुधवारी पाणी सोडताना याबाबत कोणतीच माहिती दिली गेली नाही आणि कालव्यात अचानक पाणी आल्यानं तिथं खेळणार्‍या कृष्णा धांडे आणि लक्ष्मी धांडे या बहीणभावांचा बुडून मृत्यू झाला.

लक्ष्मी आणि कृष्णा दोघंही कालव्यात खेळत असताना अचानक कालव्यात पाणी सोडण्यात आलं. अचानक वाढलेल्या पाण्याचा या चिमुरड्यांना अंदाज आला नाही आणि ही मुलं जवळपास वडगाव ते वानवडी असं दहा किलोमीटरचं अंतर वाहून गेले. आज सकाळी त्यांचे मृतदेह बी टी कवडे रोड इथे फायरब्रिगेडच्या मदतीनं पोलिसांनी बाहेर काढले. या मुलांची आई मोलमजुरी करते, तर वडिलांचा वर्षभरापूर्वी मृत्यू झाला आहे. त्यामुळे हे प्रकरण तिथेच मिटवण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र मनसेनं आता याबाबत कॅनॉल शेजारी राहणार्‍या गावांना वस्त्यांवर पाणी सोडण्याची पूर्वसूचना प्रशासनाने का दिली नाही? असा सवाल उपस्थित करत, निष्काळजीपणा करणार्‍या अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, याप्रकरणी चौकशी करून दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करू असं आश्वासन पालकमंत्री गिरीष बापट यांनी आयबीएन लोकमतशी देताना दिलं आहे. तसंच मुख्यमंत्री फंडातून पीडित कुटुंबाला दिली जाईल अशी माहितीही त्यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 5, 2016 11:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close