S M L

चक्क एमबीएचा पेपर घरी सोडवण्यासाठी आणला, काॅपीबहाद्दर तरुणीचा प्रताप

Sachin Salve | Updated On: May 20, 2016 02:29 PM IST

चक्क एमबीएचा पेपर घरी सोडवण्यासाठी आणला, काॅपीबहाद्दर तरुणीचा प्रताप

पुणे - 20 मे : निगडी इथल्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट करिअर डेव्हलपमेंट या कॉलेजमध्ये घेतल्या जाणार्‍या एमबीएच्या परीक्षेत गैरप्रकार घडत असल्याचं समोर आलंय. एमबीएचे विद्यापीठाच्या परीक्षेचे पेपर या कॉलेजची दीप्ती परब ही विद्यार्थिनी स्वत:च्या घरी आणून कॉपी करून सोडवत असल्याचं उघड झालंय.mba paper3

निगडी येथील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट करिअर डेव्हलपमेंट या कॉलेजची ही विद्यार्थिनी आहे. दिप्ती ज्या कॉलेज मधून हा कोर्स करत आहे तिथेच तिचे पती समीर ताकवले हे एका मोठ्या पदाच्या नोकरीवर आहेत. दिप्ती कॉलेजमध्ये फक्त पेपरची हजेरी लावण्याकरीता जात होती. उत्तर पत्रिका हाती आल्यानंतर ती तिच्या उत्तर पत्रिकेवर एखादी खुण करुण ठेवायची. त्यांनतर तिचे नातेवाईक कॉलेज मधील चपराशी नितीन सावंत यांच्या मदतीने तीची वेगळी खुण केलेली उत्तर पत्रिका तिच्या घरी पाठवत असतं.

पेपर सुटल्यावर दुसर्‍या दिवशी विद्यापीठाच्या क्याप सेंटरमध्ये सिल बंध लिफाफा पोहचवण्याचं काम हे नितीन सावंत यांच्या कडे होतं. मात्र तसं न करता नितीन सावंत हा दिप्तीच्या घरी जाऊन तिची सोडवलेली उत्तर पत्रिका सिल लागलेला लिफाफा खोलून त्यात तीने घरी सोडवलेली उत्तर पत्रिका टाकूण लिफाफा पुन्हा सिल करुण क्याप सेंटर मध्ये पोहचावायचा. शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी दिप्ती परब आणि नितीन सावंत यांच्या हालचाली वर नजर ठेवून दीप्तिच्या घरावर धाड़ टाकली आणि हा सर्व गैर प्रकार समोर आणला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तक्रारी वरुन नितिन सावंत आणि त्याचा सहकारी सतीश गोटे विरोधात चतुशृंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. दिप्ती आणि तिचा पती यांचा प्रकरणात नेमकी काय भूमिका आहे याचा पोलीस तपास करत आहेत. मात्र राजरोसपणे कॉपी करणार्‍या विद्यार्थिनीवर कठोर कायदेशीर करवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकर्‍यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 20, 2016 11:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close