S M L

डी.एस.कुलकर्णी यांच्या कारला अपघात, चालक जागीच ठार

Samruddha Bhambure | Updated On: May 26, 2016 09:56 AM IST

डी.एस.कुलकर्णी यांच्या कारला अपघात, चालक जागीच ठार

25 मे : सुप्रसिद्ध डीएसके समुहाचे बांधकाम व्यवसायिक आणि उद्योगपती डी.एस.कुलकर्णी यांच्या कारला मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर काल (बुधवारी) मध्यरात्री भीषण अपघात झाला. अपघातात कुलकर्णी यांचा चालक नीरज सिंग जागीच ठार झाला असून, कुलकर्णी गंभीर जखमी झाले आहेत.

मुंबईहून पुण्याकडे जाताना खंडाळा एक्झिटजवळ कुलकर्णी यांच्या विरुद्ध दिशेनं येणार्‍या टँकरनं जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की कुलकर्णी यांचा चालक नीरज सिंग जागीच ठार झाला. त्यांना पोलीस आणि आयआरबीच्या कर्मचार्‍यांनी तातडीने लोकमान्य हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार करण्यात आलं. अपघातात कुलकर्णी यांच्या बरगड्यांना फ्रॅक्चर झालं असून हाताला आणि खांद्याला मार लागल्याचं लोकमान्य हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितलं असून आता त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 26, 2016 08:38 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close