S M L

अमित शहांविरोधात घोषणाबाजी, भाजप आणि आप कार्यकर्त्यांमध्ये झटापट

Sachin Salve | Updated On: Jun 5, 2016 03:52 PM IST

अमित शहांविरोधात घोषणाबाजी, भाजप आणि आप कार्यकर्त्यांमध्ये झटापट

पुणे - 05 जून : पुण्यात बालगंधर्व नाट्यमंदिरात भाजपचा महामेळावा सुरू आहे. या मेळाव्यात भाजप आणि आप, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. अमित शहांच्या विरोधात घोषणाबाजी करणार्‍या आप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

पुण्यामध्ये बालगंधर्व नाट्यमंदिरात भाजपचा महामेळावा सुरू आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे मेळाव्यात उपस्थित होते. यावेळी नाट्यमंदिराबाहेर काँग्रेस आणि आपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. अमित शहा 'हाय हाय' अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. यावेळी आपच्या कार्यकर्त्यांनी खडसेंच्या राजीनाम्याचे पोस्टरही झळकावले. याला प्रत्युत्तर देत भाजपचे कार्यकर्तेही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर धावून गेले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. पोलिसांनी हस्तक्षेप करतघोषणाबाजी करणार्‍या आप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर मेळावा सुरळीत सुरू झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 5, 2016 03:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close