S M L

कुत्रा अंगावर धावून गेल्याच्या वादातून तरूणाचा मृत्यू

Samruddha Bhambure | Updated On: Jul 28, 2016 01:38 PM IST

कुत्रा अंगावर धावून गेल्याच्या वादातून तरूणाचा मृत्यू

पुणे  - 28 जुलै : पुण्यात दोघांच्या भांडणामुळे तिसर्‍याच व्यक्तीचा हकनाक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कुत्रा अंगावर धावून गेल्याच्या कारणावरून दोन गटांत झालेल्या वादात सागर चौघुले या तिसर्‍याच व्यक्तीचा बळी गेल्याची घटना काल (बुधवारी) रात्री हडपसरमधील दौरीनगरमध्ये घडली आहे.

दौरीनगर भागात राहणार्‍या निलेश शिंदे यांच्या अंगावर काल संध्याकाळी गणेश वाबळे याचा गावठी कुत्रा धावून गेला. तो कुत्रा नेहमी अंगावर येतो अशी तक्रार बावळे यांच्याकडे केली असता त्या दोघांमध्ये वाद झाला. त्याचवेळी निलेशचा मित्र असणार्‍या सागर चौघुलेने वाद सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आणि ते भांडण तिथेच मिटलं. मात्र याचा राग मनात धरून थोड्या वेळाने वाबळे काही तरूणांसह परतला आणि त्याने शिंदे आणि मित्रांना मारहाण केली. त्यामध्ये सागर चौघुले हा गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला. या भांडणात सनी चौगुले, संदीप शिंदे, शकुंतला सावंत हे जखमी झाले आहेत.

याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून आणखी तिघे जण फरार असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 28, 2016 11:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close