S M L

पुण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून 10 मजूर ठार

Samruddha Bhambure | Updated On: Jul 29, 2016 01:33 PM IST

पुण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून 10 मजूर ठार

पुणे - 29 जुलै : पुण्यातील बालेवाडी इथे इमारतीचा स्लॅब कोसळून 10 मजुरांचा मृत्यू झाला आहे. तसंच ढिगार्‍याखाली आणखीन काही जण अडकल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

बालेवाडी मैदानाजवळील पार्क एक्स्प्रेस याइमारतीचे काम सुरु असतानाच अचानक 14 व्या मजल्याचा स्लॅब कोसळला आणि काही कामगार त्याखाली अडकले. तर काही जण 14 व्या मजल्यावरून थेट खाली पडले आणि त्यांचा मृत्यू झाला. हे सर्व मजूर परप्रांतीय असून त्यामुळे त्यांची ओळख पटण्यात वेळ लागत असल्याचं सांगितलं जात आहे.

या दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तेथे धाव घेत ढिगार्‍याखाली दबलेल्यांना बाहेर काढून उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. दरम्यान, ही इमारत कोसळण्याच्या या घटनेबाबत पुण्याचे महापौर प्रशात जगताप यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 29, 2016 01:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close