S M L

पुणेकरांसाठी खुष खबर, पाणी कपात अखेर रद्द!

Samruddha Bhambure | Updated On: Aug 6, 2016 10:11 PM IST

girish bapat06 ऑगस्ट :  पुणेकरांना गेल्या अकरा महिन्यापासून सतावणार्‍या पाणी कपातीच्या समस्येवर अखेर शनिवारी तोडगा निघाला आहे. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी शनिवारी सर्वपक्षीय बैठकीमध्ये पुण्याची पाणी कपात रद्द करण्यात आल्याची घोषणा केली.

खडकवासला प्रकल्पामधील पाणीसाठ्याच्या कमतरतेमुळे पुणे शहरामध्ये पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानुसार, पुणे शहरात सप्टेंबर महिन्यापासून दिवसाआड पाणी पुरवठा सुरू होता. राष्ट्रवादीने पाणी कपात रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र, धरणामध्ये पाणीसाठा होत नाही तोपर्यंत पाणी कपात सुरुच राहणार असल्याची भूमिका बापट यांनी घेतली होती.

सध्या पुणे परिसरात पावसाचा जोर कायम असून पुण्याला पाणीपुरवठा करणार्‍या खडकवासला धरणामध्ये 90 टक्क्याहून अधिक पाणी पाणीसाठा झाला आहे. धरणातील पाणी साठयात वाढ झाल्यामुळे पुण्यातील नागरिकांची पाणी कपातीतून सुटका झाली आहे. गेल्या वषच् याच दिवशी या धरणामध्ये अवघा 14.03 टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 6, 2016 10:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close