S M L

तळेगावात इंद्रायणी कॉलेजमध्ये विद्यार्थ्याची निर्घृण हत्या

Sachin Salve | Updated On: Sep 2, 2016 05:51 PM IST

तळेगावात इंद्रायणी कॉलेजमध्ये विद्यार्थ्याची निर्घृण हत्या

पुणे, 02 सप्टेंबर : तळेगावच्या इंद्रायणी कॉलेजमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांवर प्राणघातक हल्ला झालाय. या हल्ल्यात चेतन पिंजण या विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय. इंद्रायणी कॉलेजमध्ये विद्यार्थ्याची हत्या झाल्यानं तळेगावात खळबळ माजलीये.

चेतन दत्तात्रय पिंजण हा 17 वर्षांचा अल्पवयीन विद्यार्थी  पानसरे वस्तीत राहत होता. चेतन हा आज सकाळी नेहमी प्रमाणे कॉलेजला गेला असताना कॉलेजच्या आवारात त्याच्यावर दोघांनी मागून धारधार शस्त्राने डोक्यावर आणि छातीवर अनेक वार केले. त्यात तो गंभीर जखमी झाला होता.

त्यानंतर त्याला तात्काळ उपचारांसाठी सोमाटणे फाटा येथील खाजगी रूग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.  चेतन याचे काल कॉलेज परीसरात काही तरूणाबरोबर भांडण झाले होते. त्यातूनच चेतनवर  हा हल्ला करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. चेतनचे मारेकरी अद्याप फरार असून तळेगाव पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 2, 2016 05:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close