S M L

पुण्यातही '#एकमराठालाखमराठा'चा एल्गार, अजित पवारही सहभागी

Sachin Salve | Updated On: Sep 25, 2016 03:23 PM IST

पुण्यातही '#एकमराठालाखमराठा'चा एल्गार, अजित पवारही सहभागी

 

25 सप्टेंबर :  महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुण्यातही '#एकलाखएकमराठा'चा एल्गार पाहण्यास मिळाला. लाखोंच्या संख्येत मराठा बांधव या मोर्च्यात एकवटले होते. विशेष म्हणजे या मोर्च्यात राष्ट्रवादीचे नेते अजित पवारही सहभागी झाले होते. तसंच आंतराष्ट्रीय धावपटू ललिता बाबर, गायिका कार्तिकी गायकवाड यांच्यासह सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरही उपस्थित आहेत.

पुण्यातल्या अलका टॉकिज चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली आणि जिल्हाधिका•यांना निवेदन देऊन मोर्च्याचा समारोप झाला. या मोर्च्यात शिस्तबद्ध पद्धतीने आधी महिला त्यानंतर वकील, डॉक्टर शेतकरी अशी समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी आणि त्यानंतर सर्वसामान्य मराठा बांधव सहभागी झाले.या क्रांती मोर्चात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सहभाग घेतला. डेक्कनच्या संभाजी महाराज पुतळ्या पासून अजित पवार या मोर्च्यात सहभागी झाले. यावेळी त्यांच्या हातात 'मूक मोर्चा' असं लिहिलेले कागद होते. आणि पत्रकारांनी काही विचारल्यावर तो कागद दाखवत त्यांनी मराठा मूक मोर्चाला पाठिंबा दर्शविला.

अजित पवारांसह शिवसेनेचे शिरूरचे खासदार शिवाजी आढाळराव पाटील मावळचे खासदार श्रीरंग बारणे, जलसंपदा राज्य मंत्री विजय बापू शिवतारे, माजी आमदार विनायक निम्हण आणि महादेव बाबर देखील सहभागी झाले आहेत.

तर दुसरीकडे, या मोर्च्यामध्ये तरुण गायिका कार्तिकी गायकवाड ही पण सहपरिवार सामिल झाली होती. यावेळी मोर्चामध्ये सहभागी होणा•याचा उत्साह वाढवण्यासाठी कार्तिकी आणि कौस्तुभने एक शौर्य गीतीही सादर केलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 25, 2016 02:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close