S M L

उजनी धरण 90 टक्के भरलं

Sachin Salve | Updated On: Sep 25, 2016 01:07 PM IST

उजनी धरण 90 टक्के भरलं

25 सप्टेंबर : उजनी धरणात आज 90 टक्के पाणीसाठा झालाय. यामुळे पुणे, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी सुखावला आहे. आज ही टक्केवारी गेल्या दोन वर्षातील खालावलेल्या पातळीनंतर आहे. प्रचंड दुष्काळाची दाहकता असल्याने उजनी धरण आणि त्यावर अवलंबून असणारे सर्वच घटक दुष्काळाने होरपळून निघाले होते.

राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे उजनी धरणातील पाणीसाठा मृतावस्थेत पोहोचला होता. पण परतीच्या पावसाने पुणे जिल्ह्यासह धरणांमध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने सप्टेंबर महिन्यात हे धरण 90 टक्के भरलंय. यामुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांसह बळीराजाही आनंदून गेलाय. या धरणाद्वारे सोलापूर शहरासह पुणे, अहमदनगर जिल्ह्यातील सुमारे 35 लाख लोकांना पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला जातो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 25, 2016 01:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close