S M L

पुणे महापालिका निवडणुकीत 4 वार्डांचा एक प्रभाग

Sachin Salve | Updated On: Oct 7, 2016 11:16 PM IST

pune palika07 ऑक्टोबर : पुणे महापालिकेच्या 2017 च्या फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या निवडणुकांची प्रभाग रचना आणि आरक्षण आज जाहीर झालं. प्रथमच 4 वॉर्डांचा एक प्रभाग अशा पद्धतीने होणाऱ्या निवडणुकीत 41 प्रभाग असतील.

161नगरसेवक निवडून येतील यात निम्म्या म्हणजे 81 महिला असतील. 44 वॉर्ड ओबीसी उमेदवारांकरता तर 22 वॉर्ड एससी उमेदवारांकरिता आरक्षित असतील. 2 वॉर्डस एसटी उमेदवारांकरता आरक्षित ठेवण्यात आलेत. 10 ऑक्टोबरपासून प्रभाग रचनेवर हरकती नोंदवण्यात येतील. 4 नोव्हेंबरला समिती समोर हरकतींची सुनावणी होऊन नंतर अंतिम प्रभाग रचना जाहीर होईल. दरम्यान प्रभाग रचना जाहीर होताच सत्ताधारी राष्ट्रवादी आणि सत्ताकांक्षी भाजपमध्ये जुंपली आहे.

अशी असेल प्रभाग रचना

पुण्यात 41 प्रभाग

एकूण 161 नगरसेवक

81 महिला नगरसेवक

44 वॉर्ड्स ओबीसी उमेदवारांकरता आरक्षीत

22 वॉर्ड्स एससी उमेदवारांकरता आरक्षीत

2 वॉर्ड्स एसटी उमेदवारांकरता आरक्षित

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 7, 2016 11:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close