S M L

अभिनेत्री आश्‍विनी एकबोटेंचं निधन

Sachin Salve | Updated On: Oct 22, 2016 10:23 PM IST

 अभिनेत्री आश्‍विनी एकबोटेंचं निधन

पुणे, 22 ऑक्टोबर : प्रख्यात अभिनेत्री आश्‍विनी एकबोटे यांचं निधन झालंय. त्या 44 वर्षांच्या होत्या. भरत नाट्यमंदिरात प्रयोग सुरू असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांचं रंगमंचावरच आकस्मित निधन झालं.

पुण्यात भरत नाट्यमंदिरात 'नाट्यत्रिविधा' हा नृत्यनाट्याचा कार्यक्रम सुरू असतानाच त्या स्टेजवर कोसळल्या. त्यांना तात्काळ गोरे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डाॅक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केलं. आश्‍विनी एकबोटे या उत्तम नृत्यांगनाही होत्या. आश्‍विनी एकबोटे यांनी टेलिव्हिजनवरच्या मालिकांमध्येही काम केलंय. 'स्टार प्रवाह' च्या दुर्वा या मालिकेतली त्यांची भूमिका गाजली. राधा ही बावरी, ध्रुव, कशाला उद्याची बात, तू भेटसी नव्याने याही त्यांच्या मालिका आहेत. त्यासोबतच त्यांनी मराठी चित्रपटावरही आपला ठसा उमटवला. क्षण हा मोहाचा, आरंभ 2011, दणक्यावर दणका आणि अलीकडे प्रदर्शित झालेल्या तप्तपदी, बावरे हे प्रेम आणि महागुरू या चित्रपटात काम केलंय. एका क्षणात, त्या तिघांची गोष्ट या नाटकांमध्ये आश्‍विनी एकबोटेंनी भूमिका केल्या. त्यांच्या निधनामुळे कलाविश्‍वावर शोककळा पसरलीय.

आश्विनी एकबोटेंची कारकिर्द

नाट्य

एका क्षणात

त्या तिघांची गोष्ट

मालिका

दुर्वा

राधा ही बावरी

ध्रुव

 कशाला उद्याची बात

 तू भेटसी नव्याने

चित्रपट

क्षण हा मोहाचा

 आरंभ 2011

 दणक्यावर दणका

तप्तपदी

 बावरे हे प्रेम

महागुरू

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 22, 2016 10:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close