S M L

... अन्यथा उद्यापासून बँका बंद ; पुणे सहकारी बँक असोसिएशनचा इशारा

Samruddha Bhambure | Updated On: Nov 18, 2016 01:48 PM IST

... अन्यथा उद्यापासून बँका बंद ; पुणे सहकारी बँक असोसिएशनचा इशारा

 

18 नोव्हेंबर :  सहकारी बँकांवर लादलेले निर्बंध मागे घेण्याच्या मागणीसाठी एल्गार पुकारण्यात आला आहे. नागरी सहकारी बँकांबाबत आजच निर्णय घ्या अन्यथा उद्यापासून बँका बंद करु, असा इशारा पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनने दिला आहे.

पाचशे हजारच्या नोटा बंद केल्यानंतर अशा नोटा स्वीकारण्यास सहकारी बँकांना बंदी घालण्यात आलीय. मात्र स्थानिक पातळीवर काळा पैसा पांढरा होण्याची शक्यता असल्याने केंद्र सरकारने सहकारी बँकांवर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे सहकारी बँकांचे व्यवहार ठप्प आहेत.

नागरी सहकारी बँकांचे हजारो कोटी रुपये व्यापारी बँकांमध्ये आहेत. मात्र व्यापारी बँका सहकार्य करत नसल्याने बँका बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसंच रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

'सहकारा'ची कोंडी

  • देशभरात 1 हजार 575 नागरी सहकारी बँका
  • 525 नागरी सहकारी बँका महाराष्ट्रात
  • पुणे जिल्ह्यात सुमारे 900 शाखा 350 एटीएम केंद्र
  • पुणे जिल्ह्यात सहकारी बँकांकडे 75 लाख सभासद
  • पुण्यातील सहकारी बँकांकडे 42 हजार कोटींच्या ठेवी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 18, 2016 01:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close