S M L

प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ सुलभा ब्रम्हे यांचं निधन

Samruddha Bhambure | Updated On: Dec 1, 2016 04:41 PM IST

प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ सुलभा ब्रम्हे यांचं निधन

01  डिसेंबर :  ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, अर्थतज्ज्ञ आणि लेखिका डॉ. सुलभा ब्रह्मे यांचं आज (गुरुवारी) पुण्यात निधन झालं. त्या 84 वर्षांच्या होत्या.

कम्युनिस्ट विचारांच्या मुशीत वाढलेल्या सुलभाताईंनी पुण्यात लोकायत संस्थेची स्थापना केली. लोकायतच्या माध्यमातून त्यांनी लोककेंद्री विज्ञान आणि समाज-अर्थशास्त्र यातील विविध पैलूंवर मराठीतून प्रबोधनात्मक लेखन केलं होतं. एन्रॉन, जैतापूर अणुवीजप्रकल्पाच्या विरोधी लोकचळवळीत त्यांचा सहभाग होता. ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक माधव गाडगीळ यांच्या त्या बहिण होत्या. त्यांच्या जाण्याने कम्युनिष्ट चळवळीतील एक खंदा कार्यकता हरपल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केलीय.

डॉ. सुलभा ब्रह्मे यांनी लोकायतच्या माध्यमातून लोककेंद्री विज्ञान आणि समाज-अर्थशास्त्र यातील विविध पैलूवर मराठीतून प्रबोधनात्मक लेखन केले होते. त्यांनी एन्रॉन, जैतापूर अणुवीज प्रकल्पाच्या विरोधी लोकचळवळीत सहभाग घेतला होता. त्यांनी प्लॅनिंग फॉर द मिलियन्स, प्रोडय़ुसर्स को-ऑपरेटिव्हज एक्सपिरीयन्स अँड लेसन्स फ्रॉम इंडिया, डॉटस् इन महाराष्ट्रा अशा विविध पुस्तकांचे लेखन केले.

विज्ञान, समाज-अर्थशास्त्रावरील प्रबोधनात्मक लेखन त्यांनी केले आहे. डॉ. सुलभा ब्रह्मे यांनी अर्थशास्त्रात पीएच्.डी केली आहे. गोखले अर्थशास्त्र संस्थेत संशोधक पदावर त्यांनी काम केले. लोकविज्ञान संघटना, शंकर ब्रह्मे समाजविज्ञान ग्रंथालय, लोकायत यांद्वारा लोककेंद्री विज्ञान व समाज-अर्थशास्त्र यातील विविध पैलूंवर मराठीतून प्रबोधनात्मक लेखन त्यांनी केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 1, 2016 04:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close