S M L

ऑपरेशन केलं पण पेशन्टची काळजी नाही -शरद पवार

Sachin Salve | Updated On: Dec 4, 2016 03:49 PM IST

ऑपरेशन केलं पण पेशन्टची काळजी नाही -शरद पवार

05 डिसेंबर : डॉक्टरने ऑपरेशन व्यवस्थित केलं पण त्यानंतर पेशंटची काळजी घेतली नाही. त्यामुळे पेशन्ट दगावतो की काय अशी परिस्थिती निर्माण झालीये अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केलीये.

पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यशाळेत शरद पवारांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळा पैशांविरोधात लढाईला जाहीरपणे पाठिंबा दिला. सध्याच्या चलनासंबंधी निर्णयाला विरोधकांचा विरोध आहे. मात्र मी पहिल्यांदा राष्ट्रवादीचा पाठिंबा जाहीर करतोय. पण निर्णयाच व्यवस्थापन नव्हतं. त्यामुळे समाजात अस्वस्थता निर्माण झालीये. डॉक्टरने ऑपरेशन व्यवस्थित केलं पण त्यानंतर पेशन्टची काळजी घेतली नाही. त्यामुळे पेशन्ट दगावतो की काय अशी परिस्थिती निर्माण झालीये अशी टीका शरद पवारांनी केली.

'आधी कार्ड वापरणे सांगा'

तसंच मोदींच्या कॅशलेस व्यवहार करा या आवाहनाचाही शरद पवारांनी समाचार घेतला. जगातील या क्षेत्रातील तज्ञानी अभ्यास केला किती चलन वापरल जातं. त्यानुसार, भारतात 92 टक्के व्यवहार रोखीत होतात. अमेरिकेसारख्या महासत्ता राष्ट्रातही 55 टक्के व्यवहार हा रोखीनेच होतो. सिनेमाला जाणं असेल किंवा मॉलमध्ये खरेदी असेल त्यासाठी हे सहज वापरण्याजोगं आहे. पण कार्ड म्हणजे काय हे ग्रामीण भागात माहीतच नाही. मुळात शेतकरी, मजुराचा व्यवहार हा रोखीनेच असतो त्यामुळे आधी कार्ड कसे वापरायचे तेही सांगा मग कॅशलेस व्यवहाराचं आवाहन करा असा सल्लावजा टोलाही पवारांनी लगावला.

'सहकारी बँकांनाही हक्क'

सहकारी बँक कोंडीवरही शरद पवारांनी टीका केली. राष्ट्रीयकृत बँकांना जसा पैसे घ्यायचा आहे तसाच हक्क सहकारी बँकांना देखिल होता. पण, 8 तारखेला नोटाबंदीची घोषणा केली आणि 4 दिवसांनंतर सहकारी बँकांना नोटा स्वीकारण्यास मनाई केली. सहकारी बँकांमध्ये तब्बल 5200 कोटी जमा झाले. कोणीच पैसे घेत नव्हतं. त्यामुळे एवढी मोठी रक्कम कुठं ठेवायचा हा प्रश्न निर्माण झाला. राज्यभरात 1 कोटीच्या पुढे ठेविदार आहे. पुणे जिल्हा बँकेला रोज 45 कोटीची गरज असताना 50 लाख मिळत होते असंही पवार म्हणाले.

'निर्णय चांगला व्यवस्थापन चुकीचं'

जनधन खात्यातील पैसे काढू नका असं आवाहन मोदींनी केलं. पण, निर्णय चांगला आहे पण व्यवस्थापन चांगलं नाही. आज शेतीचा माल वाहतूक करणा-या ट्रकची संख्या 50 टक्क्याने कमी झालीये. कारण ड्राइव्हरला पैसे द्यायला त्यांच्याकडे पैसे नाहीत. नोटाबंदीला पाठिंबाल दिला पाहिजे पण सामन्यांसाठी चुका सांगायची जबाबदारीही आपली आहे. सुरुवातीला हा निर्णय चांगला असल्याचं म्हणत अनेकांनी पाठिंबा दिला. आता मात्र तिच लोकं कुरकुर करत आहे असा टोलाही पंवारांनी लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 4, 2016 03:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close