S M L

पुणे मेट्रोचं भूमिपूजन पवार करतील, नाही मोदी ; भाजप-राष्ट्रवादीमध्ये जुंपली

Sachin Salve | Updated On: Dec 7, 2016 08:27 PM IST

पुणे मेट्रोचं भूमिपूजन पवार करतील, नाही मोदी ; भाजप-राष्ट्रवादीमध्ये जुंपली

07 डिसेंबर 2016 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमी एकमेकांची स्तुती करतात, कार्यक्रमात एकत्र सहभागी होतात. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेकांशी चांगले संबंध असल्याचं बोललं जातं. पण पुणे मेट्रोच्या भूमिपूजनावरून मात्र भाजप आणि राष्ट्रवादीत जुंपलीय.

भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 24 डिसेंबरला मेट्रोच्या भूमिपूजनाचा घाट घातलाय तर राष्ट्रवादीने शरद पवारांच्या हस्ते भूमिपूजनाचा ठराव मंजूर केलाय. पुणे महापालिकेच्या पक्षनेत्यांच्या बैठकीत हा ठराव मांडण्यात आला. या ठरावाला राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मनसेनं पाठिंबा दिलाय. भाजपने याला विरोध केला आणि शिवसेनेनही भाजपला साथ दिलीय.

2014 साली नागपूर आणि पुणे या दोन्हा मेट्रोचा एकत्रित तयार करण्यात आला होता. पण मोदी सरकार आल्यानंतर नागपूर मेट्रोला प्राध्यान्य देण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागपूर मेट्रोचं भूमिपूजनही केलं. या सगळ्या राजकारणात पुणे मेट्रो मात्र रखडलीय.

2017च्या फेब्रुवारी महिन्यात पुणे महापालिकेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांच्या तोंडावर पुणे मेट्रोसाठी  श्रेयाचं राजकारण सुरू आहे. दरम्यान, पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला केंद्र सरकारने मंजुरी दिलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 7, 2016 08:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close