S M L

...तर तुम्हाला झोपू देणार नाही, पंतप्रधानांचा काळा पैशावाल्यांना इशारा

Sachin Salve | Updated On: Dec 24, 2016 09:28 PM IST

 ...तर तुम्हाला झोपू देणार नाही, पंतप्रधानांचा काळा पैशावाल्यांना इशारा

24 डिसेंबर : गरिबांच्या वाट्यांचं गरिबांना मिळालं पाहिजे. आता काळा पैशावाल्याकडे पर्याय नाहीये. कायद्याचं पालन करा आणि जर तुम्ही वठणीवर आला नाहीतर मी तुम्हाला झोपू देणार नाही असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैशावाल्यांना दिला. तसंच मोठ्या हिंमतीने काळा पैशाविरोधात लढाई पुकारली आहे असंच मागे हटणार नाही असा निर्धारही मोदींनी बोलून दाखवला.

पुण्यात पुणे मेट्रोचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलंय. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान मोदी एकाच व्यासपीठावर आले. यावेळी केद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांच्या मान्यवर हजर होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खास फुले पगडी देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मोदींनी पुन्हा एकदा नोटबंदीवर रोखठोक भूमिका मांडली.

'गावांचा विकास करणार'

आज शहरांचा विकास होतोय. तसाच विकास हा गावांचाही झाला पाहिजे. आत्मा हा गावाचा असला पाहिजे पण सुविधा शहरांची असायला पाहिजे. गावांचा विकास कसा होईल यावर आमचा अधिकाधिक भर आहे. त्यामुळे डिजिटल इंडिया हे फक्त शहरांसाठी नाहीतर गावांसाठीही आहे असंही पंतप्रधानांनी स्पष्ट केलं. लोकसभा निवडणुकीपूर्वी मेट्रोचं आश्वासनं दिलं होतं आता राज्य सरकार आणि केंद्र सरकार असे दोन इंजिन तुम्हाला मिळाले असून लवकरच मेट्रो धावेलं असं आश्वासनही मोदींनी पुणेकरांना दिलं. त्यांनंतर त्यांनी आपला मोर्चा नोटबंदीकडे वळवला.

'आधीच्या सरकारच्या पापांची शिक्षा जनतेला'

1998 साली बेनामी संपत्तीचा कायदा मागील सरकारने लागू केला नाही. जर आधीच्या सरकारने हा निर्णय़ लागू केला असता तर आज काळा पैसा निर्माण झाला नसता. त्यामुलए आधीच्या सरकारने जी काही पापं केली त्याची शिक्षा जनतेला भोगावी लागतेय. त्यामुळे आम्हाला कठोर निर्णय घ्यावे लागले. 8 नोव्हेंबरच्या नोटबंदीचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर सर्वांना एका रांगेत उभं केलं.  आधी 100 रुपयाकडे फारसं लक्ष दिलं जात नव्हतं पण त्यानंतर 100 रुपयाची ताकद वाढली आहे. छोट्या नोटांचं महत्त्व लोकांना कळायल लागलंय. आता नोटबंदीमध्ये लोकांना त्रास झालाय. याची मला जाणीवर आहे. त्याच्या वेदना  मलाही आहे पण फक्त काही दिवस थांबा प्रामाणिक माणसांची यातून सुटका होईल असा दावा पंतप्रधानांनी केला.

'मोठ्या हिंमतीने निर्णय घेतला'

व्यासपीठावर शरद पवार आहेत. ते कृषिमंत्री राहिले होते. त्यांना चांगलं माहितं आहे की, कांद्याचं जास्त उत्पन्न झालं तर भाव घसरतात. तसंच नोटांच्या बाबतीत झालंय. नोटा जास्त छापल्या गेल्यामुळे नोटांची किंमत वाढली. त्यामुळे नोटबंदीचा निर्णय घ्यावा लागला. मोठ्या हिंमतेनं काळा पैशाविरोधात लढाई सुरू केलीये.  पण तरीही काही लोकांना वाटलं काही फरक पडणार नाही. पण बँकेत पैसे भरले आणि आता तोंड काळे झाले. पण  वेळ कमी राहिला आहे. त्यामुळे  वाचण्याचे प्रयाय उरले नाही, कायद्याचं पालन करा. गरिबांच्या वाट्याचं गरिबांना द्या. जर तुम्ही वठणीवर आला नाहीतर मी तुम्हाला झोपू देणार नाही असा इशाराच  पंतप्रधान मोदींनी काळा पैशावाल्यांना दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 24, 2016 09:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close