S M L

गिरीश बापट हे उन्मत्त, शिवतारेंची जहरी टीका

Sachin Salve | Updated On: Dec 26, 2016 09:51 PM IST

गिरीश बापट हे उन्मत्त, शिवतारेंची जहरी टीका

26 डिसेंबर : गिरीश बापट हे उन्मत्त आहेत. बापट आणि त्यांचे कंपू काँग्रेस-राष्ट्रवादीला मदत होईल असं काम करत आहेत अशी घणाघाती टीका शिवसेनेचे पुरंदरचे आमदार आणि राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केलीये.

पुणे मेट्रोचा शनिवारी भूमिपूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते पार पडला. पण या कार्यक्रमाला विजय शिवतारे यांना निमंत्रण नव्हतं. त्यामुळे विजय शिवतारे यांनी गिरीष बापटांवर हल्लाबोल केला. आम्ही सत्तेत असून सुद्धा मेट्रोच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात आमचं कुठे नाव नव्हतं आणि बोलावणं नाही. मुळात  गिरीश बापट हे उन्मत्त आहेत अशी जहरी टीका शिवतारे यांनी केली. तसंच गिरीश बापट आणि त्यांचे कंपू काँग्रेस-राष्ट्रवादीला मदत होईल असं काम करत आहेत    असा आरोपही शिवतारे यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 26, 2016 09:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close