S M L

पुण्यातही युतीचा गाडा अडला

Sachin Salve | Updated On: Jan 21, 2017 07:38 PM IST

sena_bjp321 जानेवारी : पुणे महापालिका निवडणुकीसाठी युतीचा गाडा जागेवरच रुतल्याचं चित्र आहे. युतीसंदर्भात चर्चा करण्यासाठी भाजप - सेनेच्या नेत्यांची आज दुसरी बैठक झाली, मात्र ही बैठकही चर्चेविना संपली. त्यामुळे युतीचं गाडं जागच्या जागी अडलंय.

युतीसाठी आज भाजप आणि सेना नेत्यांची बैठक पार पडली. याबैठकीला भाजपकडून मंत्री दिलिप कांबळे, शहराध्यक्ष योगेश गोगावले, सेनेचे माजी मंत्री शशिकांत सुतार तसंच शहरप्रमुख विनायक निम्हण बैठकीला हजर होते. आजच्या बैठकीत केवळ तांत्रिक माहितीचं आदान प्रदान झाल्याचं सांगण्यात आलं.  त्यामुळे पुण्यात युती होणार असा दावा दोन्ही पक्ष करत असले तरी त्यासाठीच्या चर्चेचा नुसताच फार्स सुरू असल्याचं म्हणता येईल. नेते कितीही नाकारत असले तरी युतीबाबतचा संभ्रम कायम आहे. कारण युतीची गाडी पुढे सरेना अशी आजची अवस्था आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 21, 2017 07:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close